झपाट्याने वाढतायत इन्फ्लूएंझा संसर्गाची प्रकरणं…
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘देशात सर्वाधिक H1N1 प्रकरणं गी तामिळनाडूमध्ये ५४५, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १७०, केरळमध्ये ४२ आणि पंजाबमध्ये २८ रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाहीतर, आयडीएसपीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये देशात श्वासाचे रोग आणि इन्फ्लूएंझा (एआरआय/आयएलआय) ची ३ लाख ९७ हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी वाढून फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३६ हजार इतकी झाली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मार्चच्या पहिल्या ९ दिवसांतच इन्फ्लूएंझाची १ लाख ३३ हजार रुग्ण आढळून आली आहेत. यामुळे देशावर धोका वाढत आहे.
व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार…
मॅक्स साकेतच्या इंटरनॅशनल मेडिसिनचे डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिकू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ताप असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होत नाही आणि ती करण्याचीही गरज नाही. पण, देशात व्हायरल इन्फेक्शनची सरमिसळ सुरू आहे, हे खरं आहे. यामुळे करोना, , H3N2 आणि H1N1 च्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असून रुग्णालयात दाखल लोकांची संख्याही यामुळे वाढत आहे.
संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरा….
स्वाईन फ्लू H1N1, इन्फ्लुएंझा H3N2 किंवा करोना हे तिन्ही संसर्गजन्य आजार असून विषाणूंद्वारे या रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे मास्क वापरणं यापासून वाचण्यासाठी उत्तम आहे. देशात आतापर्यंत या संसर्गामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. अशात मास्क घालून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इन्फ्लूएन्झाचे वेगवेगळे प्रकार पसरत आहेत…
मंत्रालयाने जारी केलेल्या डेटानुसार, SARI किंवा ILI ग्रस्त रुग्णांच्या नमुन्यांच्या चाचणीमुळे सुमारे ७९ टक्के लोकांमध्ये इन्फ्लूएंझा ए ची पुष्टी झाली आहे. अशात, तब्बल १४ टक्के प्रकरणांमध्ये इन्फ्लूएंझा बी व्हिक्टोरियाची पुष्टी झाली आहे. इन्फ्लूएन्झा बी देखील एक उपव्हेरिएंट आहे. इतकंच नाहीतर, ७ टक्के लोकांमध्ये H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लूची पुष्टी झाली आहे, हा तिसरा आणि सर्वात सामान्यपणे आढळणारा इन्फ्लूएंझा विषाणू आहे.
सध्या देशामध्ये काही जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. यामध्ये दिल्लीत कोविड पॉझिटिव्हिटी दर ३.२४% आहे. दिल्लीत ४०१ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर १३ लोक कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.
दरम्यान, इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी सतर्क राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबद्दल सूचना दिल्या आहेत. या संसर्गाची लागण होणाऱ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
ही आहेत लक्षणं…
खूप ताप येणं, त्वचा उबदार व ओलसर होणं, चेहरा लाल होणं, डोळे पाणावणं, सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी इ. ही या आजारांची गंभीर लक्षणं आहेत. अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वेळीच उपचार घेणं महत्त्वाचं आहे. तर यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरणे, गरम पाण्याचे सेवन करणे, योग्य आणि पौष्टिक आहार ठेवणे.
H3N2 होण्यापासून कशी काळजी घ्याल…
मंडळी, हा फ्लू अत्यंत संसर्गजन्य आहे. तोंडातून आणि नाकातून पडणाऱ्या थेंबांद्वारे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्यामुळे स्वच्छता राखणे, तसेच मास्क घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसातून वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. तसेच सर्दी, खोकला आणि इतर लक्षणे असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा. जेवताना हात धुतल्याशिवाय खाऊ नका. बाहेर कुठेही स्पर्श केला असेल तर लगेच तोंडाला किंवा नाकाला हात लावू नका.
H3N2 विषाणूची लक्षणे