इमरान खान यांच्या अटकेवरुन लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. यामुळं इस्लामाबाद पोलिसांना इमरान खान यांना अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळं पाकिस्तानी सेना देखील इमरान खान यांच्या अटकेसाठी लाहोरमध्ये दाखल झाली आहे.
इमरान खान यांनी ट्वीट करुन या संदर्भात भूमिका मांडली आहे. स्पष्टपणे अटक करण्याचं नाटक सुरु असल्याचं दिसत आहे. अपहरण करुन त्यांचा माझी हत्या करण्याचा डाव असल्याचं इमरान खान म्हणाले. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, पाण्याचा वापर केला जात आहे. यानंतर आता गोळीबार देखील सुरु झालाय, असं इमरान खान म्हणाले. सिक्युरिटी बाँडवर सही करुन दिलेली आहे पण डीआयजी यांनी घेण्यास नकार दिलेला आहे, असं खान म्हणाले. यावेळी इमरान खान यांनी पाकिस्तानी सेनेच्या प्रमुखांवर देखील टीका केली आहे.
पीटीआय समर्थक आणि सेना आमने सामने
इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्यदलाचे जवान हे देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी लढत आहे, असं म्हटलं. इमरान खान समर्थक आणि पोलिसांच्यामध्ये लाहोरमध्ये वाद होत आहेत. लाहोरच्या जमान पार्कमध्ये युद्धभूमी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं इमरान खान म्हणाले.
तोशखाना प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर इस्लामाबाद पोलीस इमरान खान यांच्या अटकेसाठी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. यावर इमरान खान यांनी अटक हे नाटक असून अपहरण करुन हत्या करण्याचा डाव असल्याचं म्हटलं.
इमरान खान यांच्या पीटीआय पार्टीचे सदस्य जमान पार्कमध्ये जमा झाले. इमरान खान आणि पोलीस यांच्यामध्ये पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण केला. त्यामुळं पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तरी देखील इमरान खान समर्थक मागं हटलेले नाहीत. पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमधील वाद १७ तासांहून अधिक काळ सुरु आहेत. पोलीस आणि पीटीआयचे कार्यकर्ते जखमी झाल्याची बातमी आहे.
अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं पार्थिव निवासस्थानी, अंतिम दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती