मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्जदारांना झटका बसला आहे. एसबीआयने कर्जावरील व्याजदरांमध्ये सुधारणा करताना बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट वाढवले आहेत. बँकेने बेस रेटमध्ये ०.७० टक्क्यांची वाढ केली आहे. नवीन बेस रेट आता १०.१० टक्के झाला आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे जुन्या आणि नवीन ग्राहकांचा ईएमआय वाढणार आहे.

बेस रेट

स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ मार्च २०२३ पासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. बँकेने आपला बेस रेट १०.१० टक्के केला आहे. याआधी हा दर ९.४० टक्के होता. बँकेने बेस रेटमध्ये एकूण ०.७० टक्क्यांची वाढ केली आहे. आरबीआयने सर्व बँकांना कर्ज देण्यासाठी बेस रेट लागू केला आहे. बेस रेट हा किमान व्याजदर असतो ज्यावर बँका कर्ज देतात. कोणतीही बँक बेस रेटपेक्षा कमी दराने कर्ज देत नाही.

रतन टाटांचे राइट हँड,दिवसाची कमाई ३० लाख,TCSमध्ये इंटर्न ते आज टाटा ग्रुपच्या सर्वोच्च पदावर
बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट

एसबीआयने आपला बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट म्हणजेच बीपीएलआर १४.१५ टक्क्यांवरून १४.८५ टक्के केला आहे. नवीन दर १५ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. BPLR हा अंतर्गत बेंचमार्क दर आहे. याचा उपयोग गृहकर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी केला जातो.

मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट

एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बँकेच्या मते, रात्रीचा MCLR दर ७.९० टक्के आहे. तर एक महिन्याचा MCLR ८.१० टक्के आहे. त्याचप्रमाणे, तीन महिन्यांचा MCLR ८.१०, सहा महिन्यांचा ८.४० टक्के, एक वर्षाचा ८.५० टक्के आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR अनुक्रमे ८.६० टक्के आणि ८.७० टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here