गोंदिया :- शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटना थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवून छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची तक्रार दाखल होताच आरोपी शिक्षक हेमंतकुमार येरणे याला अटक करण्यात आली. शिक्षकाला 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढत तिला अश्लील चित्रफीत दाखवत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करून या घटनेची चर्चा थंडावली नव्हती, की आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेतील पीडित विद्यार्थिनी ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडित विद्यार्थिनीसह तिच्या मैत्रिणींची सुद्धा छेड काढीत असे. इतकेच नाही तर कोणत्या न कोणत्या बहाण्याने पीडित विद्यार्थिनी किंवा तिच्या मैत्रीणींच्या पाठीवरून हात फिरवून वाईट प्रवृत्तीने स्पर्श करणे हे त्याचे नित्याचेच झाले होते.

त्याची मजल इतपत वाढली होती की त्याने पीडितेला आपल्या कक्षात एकांतात बोलावून मोबाईलमध्ये असलेली अश्लील चित्रफित दाखवायचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनीला ‘तू सुंदर आहेस, तू मला आवडतेस’ असंही सांगितलं. पीडितेसोबतच तिच्या मैत्रिणीला सुद्धा हा शिक्षक हेच बोलत असे.

हे सर्व असह्य झाल्याने पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि शिक्षक हेमंतकुमार येरणे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

तुझ्या बायकोला झोपायला पाठव, शेजाऱ्याची घाणेरडी मागणी, तरुणाने जीव घेतला, मग…
लैंगिक छळ केल्याचा पीडितेने पोलिस ठाण्यात जबाब दिल्यावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. शिक्षकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजार करण्यात आले असता तिथे त्याला २८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले गेले.

महिलेचं चारित्र्यहनन हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार?; मॉर्फ व्हिडिओ व्हायरल होताच शितल म्हात्रेंची आगपाखड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here