हैदराबाद: तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात रस्त्यावर खेळत असलेल्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्यानं जीव गमावला. कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा बळी जाण्याची ही गेल्या महिन्याभरातील दुसरी घटना आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला. खम्मम जिल्ह्यातील रघुनाथपलेम परिसरात ही घटना घडली. पुतानी थांडा यांचा ५ वर्षांचा मुलगा बनोठ भरत रस्त्यावर खेळत होता. त्याचवेळी एका भटक्या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात भरत जबर जखमी झाला. बराच रक्तस्राव झाल्यानं त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भरतमध्ये रेबीजची लक्षणं दिसू लागली होती. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र भरतचा जीव वाचू शकला नाही.
झाडाला धडकून कार पेटली, संपूर्ण कुटुंब एकाएकी बेपत्ता; १३ दिवस उलटले अन् एक दिवस अचानक…
माझा मुलगा घराजवळच असलेल्या रस्त्यावर खेळत होता. तेव्हा भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो जबर जखमी झाला. रविवारी त्याची प्रकृती खालावली. आम्ही त्याला खम्मममधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि रेबीजची लक्षणं असल्याचं सांगितलं. चांगल्या उपचारांसाठी डॉक्टरांनी भरतला हैदराबादला नेण्याचा सल्ला दिला, असं भरतची आई संध्यानं सांगितलं.
तीन संशयित, एक रिक्षा अन् ड्रममध्ये महिलेची बॉडी; तीन महिन्यातील तिसरी घटना, कनेक्शन काय?
याआधी १९ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये ४ वर्षांच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. कार सर्व्हिसिंग सेंटरच्या परिसरात ही घटना घडली. या सेंटरमध्ये मुलाचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे. तर दिल्लीतील वसंत कुंजमध्ये १० आणि १२ मार्चला कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला. आनंद (७) आणि आदित्य (५) यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here