सोबत लहान मूल असल्याने जागोजागी मुक्काम
मंद्रुपहून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक हे सध्या सोलापूर शहरात आहेत. सदर बाजार पोलीस शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. १० ते १५ किलोमीटर अंतर चालल्यावर थोडी विश्रांती घेत आहेत. लहान मुलं असल्याने शेतकऱ्यांना जागोजागी थांबा घ्यावा लागत आहे. जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांची भेट घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचना देऊनही उताऱ्यावरून बोजा उतरलेला नाही
उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. मंद्रुप येथील या शेतकऱ्यांनी १७४ दिवस आंदोलन केल्यानंतर उद्योग मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील अद्याप या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा उतरलेला नाही. त्यामुळे आता शेतकरी आर या पारची लढाईसाठी निघाले आहेत. मंद्रुप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास सुरु केला आहे. बुधवारी हे शेतकरी सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.