वर्धाः नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित जमीन आपल्या नावावर असल्याचा दाव करणाऱ्या शेतकऱ्याला खासदार यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देवळी येथील नागरी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही पाइपलाइन टाकण्यात येत असलेली जमीन आपली असल्याचा दावा करीत शेतकऱ्याने विरोध दर्शविला. यावरून वाद वाढल्याने खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्याला शिविगाळ करीत दगडफेक केली. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परस्परविरोधी तक्रारीही पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पण, खासदार तडस यांनी मात्र या घटनेचा विरोध करत असं काही घडलं नसल्याचा दावा केला असून लोकांच्या पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे.

वाचाः

संबंधित शेतकरी सरकारी कामात अडचणी आणत होता. म्हणूनच सरकारी कामात आडकाठी अणू नकोस असं सांगण्यासाठी मी तिथं गेलो होते. तिथं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकला नाही. त्यानं मला शिवीगाळही केली. मात्र, मी त्याच्यावर दगडफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण मी त्याच्यावर एकदाही दगड फेकला नसल्याचं खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

माझ्या जागेच कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेकडून बांधकाम करण्यात आलं. त्यावेळी मी बांधकाम करण्यास विरोध केला व तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यावेळी संबंधित अधिकारी माझ्या जागेत भेट देण्यास आले होते. तेव्हा खासदार रामदास तडसही उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी हे काम थांबणार नाही असं म्हटल्यावर मी माझे जागेत जाऊन उभा राहिलो व तेव्हाच त्यांनी माझ्यावर दगडफेक केली असा आरोप शेतकऱ्यांनं केला आहे. यासंबंधीत तक्रार दाखल केली असून मला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here