पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ टाकीतून कोणीही बाहेर येत नसल्याचं पाहून तिघांना वाचवण्यासाठी शेजारी राहत असलेले बापुराव गव्हाणे टाकीत उतरले. मात्र दुर्दैवानं टाकीत उतरलेल्या चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना घडली.
एकाच घरातील तीन जण गेल्यानं आटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण हा घर चालवायचा. घराची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. वडील प्रकाश आटोळे वृद्ध होते. मात्र तरीही ते घरात थोडाफार हातभार लावायचे. प्रवीण हा घरातला कर्ता होता. त्याच्या अकाली निधनानं कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आटोळे कुटुंब शेती आणि गुरांचा व्यवसाय करतं. प्रवीणला आणखी एक भाऊ असून तोही त्यांना शेतीच्या कामात मदत करायचा.
आटोळे कुटुंब शेती आणि गुरांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवायचं. प्रवीण घरातला थोरला असल्यानं त्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. मात्र आजच्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. प्रवीणचा स्वभाव मनमिळाऊ होता. बापलेक मेहनत करून कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.