सोलापूर : पत्नीच्या मसाजसाठी महिलेला घरी बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक नागेश धरणे (रा. उमा नगरी, जुनी मिल कंपाऊंड) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिता ही मसाजचं काम करते. त्यामुळे तिला या कामाचा चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे पीडित महिला त्याच कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. मसाज आणि नोकरी करून उपजिविका चालवत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे.

संशयीत आरोपी हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक

संशयित आरोपी नागेश धरणे हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. संशयित आरोपी नागेशच्या पत्नीला अस्थमाचा त्रास आहे. आजारी पत्नीचं मसाज करायचं असल्याने नागेशने पीडितेला पत्नीच्या मसाजसाठी ११ मार्च रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घरी बोलावले होते. संशयित आरोपी हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक असल्याने पीडित महिला विश्वास करत त्याच्या घरी गेली.

ठाकरेंना पुन्हा दणका, फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेला नेता शिंदेंच्या शिवसेनेत

मनास लज्जा वाटेल असं कृत्य केलं


११ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मसाज करण्यासाठी पीडित महिला गेली. पण त्यावेळी नागेशची पत्नी घरात नव्हती. तिने “तुमची पत्नी कुठे आहे”, असं विचारलं असता त्याने “सोफ्यावर बसा”, असं सांगितलं. घटनेवेळी संशयित आरोपी नागेशच्या घरात त्याची वृद्ध आई होती. आरोपी आईला दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सोडून खाली आला.

त्यानंतर त्याने सोफ्यावर बसून पीडित महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर या प्रकरणी पीडितेने याबाबत पोलीस फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

सरन्यायाधीशांनी कोश्यारींना झोडलं, प्रश्नांची सरबत्ती, उद्धव ठाकरेंना आनंद, म्हणाले,आता….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here