कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तळाशी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. हॉटेलमधील कचरा टाकण्यासाठी जात असलेल्या एका व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. लाकडाचे ओंडके भरून थांबलेल्या ट्रॉलीशी दुचाकीची धडक झाल्याने व्यावसायिकाला प्राण गमवावे लागले.

प्रकाश दादू सावरतकर (वय ५० वर्ष) असे हॉटेल चालकाचे नाव असून वाकेश्वर हॉटेल असे त्यांच्या हॉटेलचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर तळाशी पाटी ते चंद्रेपाटी दरम्यान घडली आहे. सावरतकर यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, प्रकाश दादू सावरतकर हे राधानगरी तालुक्यातील तळाशी पाटी येथे 2010 पासून वाकेश्वर हॉटेल आणि नाष्टा सेंटर चालवत होते. मनमिळावू आणि ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणारे व्यावसायिक असे त्यांची ओळख होती.

दरम्यान मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हॉटेलमधील काम उरकून गोळा झालेला कचरा टाकण्यासाठी ते दुचाकीवरून तळाशी पाटीकडून माजगावच्या ओढ्याकडे जात होते. यावेळी चंद्रेपाटी जवळ लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अँगल तुटल्याने ट्रॅक्टर बंद अवस्थेत रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला होता.

यावेळी कचरा टाकून परत येत असताना सावरतकरांना रात्रीच्या अंधारात लाईट नसल्याने ट्रॉलीचा अंदाज आला नाही आणि अशातच त्यांची दुचाकी या थांबलेल्या ट्रॉलीला जाऊन धडकली. यामध्ये सावरतकरांना डोक्याला गंभीर मार लागला व दुखापत झाली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की सावरतकर गतप्राण होऊनही दुचाकी लाकडामध्ये उभी होती.

रिअल लाईफ ‘बधाई हो’! ४७ व्या वर्षी महिलेची दुसऱ्यांदा प्रसुती, २३ वर्षांची लेक म्हणते…
सावरतकर यांना दोन मुले असून एक मुलगा त्यांना हॉटेल कामात मदत करतो तर दुसरा मुलगा हा आयटी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,आई ,सून असा परिवार आहे.

लेकीच्या पोलीस भरतीसाठी नाशिकहून पुण्याला, कंटेनरखाली चिरडून पित्याचा हृदयद्रावक शेवट
सावरतकर हे अगदी ते तेरा वर्षांचे असताना पासून हॉटेल व्यवसायामध्ये काम करत होते. यामुळे पंचक्रोशीत त्यांचे नाव होते. मनमिळाऊ आणि ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणारा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला; व्हिडीओद्वारे चाहत्यांशी साधला संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here