छत्रपती संभाजीनगर : तीस वर्षांच्या अट्टल वाहन चोराचे ४६ वर्षीय महिलेसोबत तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र गेल्या काही काळापासून एक लाख रुपयांसाठी महिला ब्लॅकमेल करुन बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणाना महिलेला विद्यापीठातील साई संस्थेजवळील निर्जनस्थळी बोलावले. तिथे दारू पाजून तिच्याच स्कार्फने गळा घोटून महिलेची हत्या करून पसार झाला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने तपास करून आरोपीला अटक केली आहे.

तुषार सुंदरलाल मेहरा (वय ३० वर्ष, रा. रोहिदास चौक, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तुषार वाहन चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता.

या प्रकरणी पोलीस सूत्रानुसार मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत अनिता उर्फ कांता कचरू दाभाडे (वय ४८ वर्ष, रा. भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) व आरोपी तुषार मेहरा या दोघांचे अनैतिक संबंध होते. तुषार नेहमी कांता यांना पैसे द्यायचा. मात्र गेल्या अनेक दिवसापासून कांता तुषारकडे एक लाख रुपयाची मागणी करीत होत्या. तुषारकडे एवढे पैसेही नव्हते, आणि त्याला एवढे पैसे देण्याची इच्छाही नव्हती. त्यामुळे तुषार कांताच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होता.

पैशांचा विषय काढला की तुषार विषयाला बगल देतो आणि वेळ मारून नेतो हे लक्षात आल्यानंतर कांता यांनी तुषारला थेट धमकी दिली. जर एक लाख रुपये दिले नाही तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी दिल्याने तुषार चिंतेत होता.

यवतमाळमध्ये प्रहारच्या नगरसेवकाची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर
घटनेच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास तुषार आणि कांता दोघेही रिक्षाने आले. रिक्षा सोडून दोघेही साईसंस्थेच्या पाठीमागील निर्जनस्थळी गेले तेथे कांता यांनी दारू प्यायली, मात्र तुषारने मद्यपान केले नाही. यावेळी दोघांत वाद झाला. तेव्हा तुषारने कांता यांच्या स्कार्फनेच गळा आवळला.
तुझ्या बायकोला झोपायला पाठव, शेजाऱ्याची घाणेरडी मागणी, तरुणाने जीव घेतला, मग…
कांता निपचित जमिनीवर पडताच तुषारने तेथून पोबारा केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शेळके, हवालदार राजेंद्र साळुंखे इत्यादीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेत हा गुन्हा उघड केला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उपोषणाला बसलेल्या नितीन देशमुखांना ठाकरे गटाच्या आमदारांची विनंती, देशमुख ऐकेनात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here