याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंदेशे गावात राहणारी ही चिमुरडी दुसरीच्या वर्गात शिकत आहे. आंदेशे गावात ती आपल्या कुटुंबासोबत राहते. तसेच संबंधित नराधम हा त्यांच्या घराशेजारीच रहात असून तो घरात एकटाच असतो. कंधारे याने या मुलीला कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे या खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवले.
गोड बोलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पौड पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे पुढील तपास करीत आहे.
घटना तालुक्यात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समजल्यावर विविध स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला. या घटनेने चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे. नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेने अनेक संघटना आक्रमक झाल्या असून कुठलाही अनुचित प्रकार घडू. नये म्हणून पोलिसांकडून गावात बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार झाला असल्याने या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.