चिंचणी समुद्र किनाऱ्यावर भर गर्दीच्या ठिकाणी मद्यपी तरुणांनी धिंगाणा घातल्याचे पाहावयास मिळाले आहे. मद्यपी तरुणांनी समुद्र किनाऱ्यावर कार नेऊन भरधाव कारच्या टपावर बसून स्टंटबाजी करताना दिसून आले. तेथे उपस्थित स्थानिकांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर धिंगाणा घालणाऱ्या या मद्यपी तरुणांना अडवून त्यांना रोखले.
समुद्र किनारी धिंगाणा घालणाऱ्या या मद्यपी तरुणांना स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मद्यपी तरुणांनी कारच्या टपावर बसून स्टंटबाजी करत धिंगाणा घटल्याचा व्हिडिओ समुद्र किनारी उपस्थित असलेल्या काही नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. तरुणांनी घातलेल्या हा धिंगाण्याचा प्रकार समाज माध्यमांवर गेले व्हायरल होत आहे.
गतवर्षी देखील येथे चिंचणी भरधाव कार समुद्र किनाऱ्यावरील खाऊ गल्ली शिरल्याने भीषण असा अपघात घडला होता. या अपघातात एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता. दरम्यान मद्यपी तरुणांचा समुद्रकिनाऱ्यावर कार चालवत धिंगाणा घालत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणी ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ