मुंबई: आयपीएल २०२३ चा हंगाम काहीच दिवसात सुरु होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १६ व्या हंगामातील पहिला सामना हा ३१ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज हा आयपीएल सुरु होण्यापूर्वीच संघातून बाहेर झाला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात या खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.२ कोटींमध्ये साईन केले होते.

आरसीबीला मोठा झटका

आरसीबीचा खेळाडू विल जॅक्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. इंग्लंडचा तुफानी फलंदाज विल जॅक्स काही काळापूर्वी जखमी झाला होता, या दुखापतीमुळे तो २०२३ च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. बांग्लादेश दौऱ्यात जॅक्सला दुखापत झाल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना विल जॅक्सच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती.

या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन आणि तज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. विल जॅक्सच्या नावे टी-२० फॉरमॅटमध्ये मोठे रेकॉर्ड आहेत. ज्यामध्ये त्याने १०९ सामने खेळून २९.८० च्या सरासरीने २८०१ धावा केल्या आहेत.

भोवळ येऊन पडली, रक्तबंबाळ झाली, विमानात थरारक प्रसंग; सांगलीचा सुपुत्र ठरला देवदूत
विल जॅक्सला हा खेळाडू पर्याय असू शकतो

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलला विल जॅक्सच्या जागी संघात जागा देऊ शकते. डिसेंबरच्या लिलावातही त्याच्याशी कोणी करार केला नव्हता. ब्रेसवेल जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर आला आणि त्याने स्फोटक शतक झळकावले होते. त्याचबरोबर गोलंदाज म्हणूनही आपली छाप सोडण्यात ब्रेसवेल यशस्वी ठरला होता.
बापरे! १२०० वर्षांपूर्वी चिखलात खजिना लपवला, आता सापडला; सोन्याचे दागिने अन्…
आरसीबी संघ –

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, अनुज रावत, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, महिपाल लोमोरे, फिन एलन, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, सुयश प्रभुदेसाई, राजत पाटीदार, आकाशदीप, विल जॅक्स, रीस टॉपले, रंजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा, मनोज भंडागे, सोनू यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here