मुंबईः राज्यात आज पुन्हा एकदा एकाच दिवशी ९ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात करण्यास यश मिळवले आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून ९ हजार ९२६ रुग्ण करोना विरुद्धची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७६ हजार ८०९ रुग्णांनी करोनाला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery rate) ६२.७४ % इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

वाचाः

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९ हजार ५०९ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २९० जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाचाः

राज्यात दिवसभरात २९० करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा १५ हजार ५७६ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ९ हजार ५०९ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ९,२५,२६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,९४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. असंही ते म्हणाले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here