अमरावती/ परभणी : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. अमरावतीत आज गुरुवारी पाहटे ४ वाजता सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या पावसाने अनेक पिकांचं नुकसान केलं आहे.संत्रा पिकासह गहू आणि हरभरा कापणीचा हंगाम सध्या जिल्ह्यात सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मशीनद्वारे काढण्यासाठी गंज लावून ठेवली होती. मात्र आज सकाळी आलेल्या पावसामुळे गंजी अनेक ठिकाणी ओल्या झाल्या. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संत्रा बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे झाडावर असलेले फळ खाली आले असून वातावरणीय बदलाचा फटका संत्र्याला बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.परभणीमध्येही पावसाची हजेरी; काढणीस आलेल्या गहू, ज्वारी पिकांना फटका परभणीमध्येही हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच पावसाने हाजरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या काढणीस आलेल्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. परभणीमध्ये सर्व ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिंतूर आणि सेलू तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. काढणीस आलेल्या गव्हाचे पीक वाऱ्यामुळे आडवे पडले हो,ते तर ज्वारी पिकाला देखील मोठा फटका बसला होता. पूर्णा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे नुकसान झाले होते. असे असतानाच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून आज सकाळपासूनच परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here