न्यूझीलंडः तुर्की येथे झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर आता आणखी एक देश भूकंपाने हादरला आहे. न्युझीलंडमध्ये गुरुवारी १६ मार्च रोजी ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केर्मेडेक बेटांवर हा भूकंप झाला असून भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर आत असल्याचं सांगण्यात येत आहे. (New Zealand Earthquake News)
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीलाच ६ फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सिरीयामध्ये भूकंपामुळं सर्व उद्ध्वस्त झालं होतं. भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी होती. यामध्ये ४४ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर लाखो लोकांची घरंही उद्ध्वस्त झाली होती. इतकंच नव्हे तर, तुर्कीत एकामागोमाग भूकंपाचे धक्के सुरुच होते. त्यामुळं दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले होते.