नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ७५ डॉलरच्या खाली पडली आहे, जी त्याची गेल्या १५ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. त्यामुळे लवकरच भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या महागाईच्या झळांनी जनतेचा खिसा रिकामा होत असून सर्वसामान्य जनतेचे बजेटही कोलमडले आहे. मात्र, आता देशातील सर्वसामान्य जनतेला लवकरच आनंदाची बातमी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विदेशी बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरवाढीला ब्रेक

आर्थिक क्षेत्रातील चढउताराचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही दिसून येत आहे. ब्लूमबर्ग कमोडिटीनुसार, ब्रेंट क्रूडचा भाव पाच किंवा सुमारे $४ ने घसरून $७३.६२ प्रति बॅरलवर पोहोचले आहे. याशिवाय दरात आणखी घसरण होण्याची शक्यता असून भाव प्रति बॅरल ७२ डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता दिसत आहे. याशिवाय अमेरिकन WTI च्या किंमतीत ५.२६ टक्क्यांची घसरण झाली असून किंमत प्रति बॅरल $३.६३ ने घसरून भाव प्रति बॅरल $६७.७० रुपयावर घसरला आहे. अशा प्रकारे दोन्ही कच्च्या तेलाच्या किमती डिसेंबर २०२१ च्या खालच्या पातळीवर पडल्या आहेत.

जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा नेमका काय? Old Pension लागू करण्याच्या मागणीचे कारण काय
भारतातही भाव पडले

दुसरीकडे, भारताच्या फ्युचर्स मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ६% घसरण झाली असून किंमत ३४६ रुपयांनी घसरून पाच हजार ६३७ रुपये प्रति बॅरलवर आली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कच्च्या तेलाचा भाव एक वेळी ५,६१७ रुपयांवर गेला होता. तसेच वायदा बाजारात कच्चे तेल ५,९६८ रुपयांवर उघडले होते. अशा स्थितीत तज्ञांनुसार भावात अशीच घसरण कायम राहिल्यास कच्चे तेल ५,५०० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे.

देशातील प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलचा भावगेल्या वर्षभरापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. मे २०२२ रोजी राष्ट्रीय पातळीवर इंधन दरात अखेरचा बदल करण्यात आला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावात चढउतार होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. दरम्यान आजही दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होताना दिसत आहे.

कमाईची बंपर संधी… सवलतीत खरेदी करा टाटा, रिलायन्सचे हेवीवेट शेअर्स, जाणून घ्या तपशील
एक SMS पाठवून दर तपासून घ्याभारतातील सरकारी तेल व्हिप्पन कंपन्या आपल्या ग्राहकांना घरबसल्या एका एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्याची सुविधा देतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ तर HPCL ग्राहक ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवून इंधनाचे दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here