मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आज सलग सहाव्या व्यवहार दिवशी देशांतर्गत बाजाराची घसरणीच्या मार्गावर वाटचाल झाली आहेत. दिवसाच्या सकाळच्या व्यवसाय सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल चिन्हावर घसरले. तर काही मिनिटांच्या व्यवहारानंतर दोन्ही निर्देशांकांचे नुकसान आणखी वाढले.

प्री-ओपनमध्ये बाजारावर दबाव
आज सत्र सुरू होण्यापूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारावर दबाव दिसून येत होता. प्रो-ओपन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात व्यवहार करत होते. तर सत्र सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स सुमारे ५० अंकांनी घसरला होता.

कमाईची बंपर संधी… सवलतीत खरेदी करा टाटा, रिलायन्सचे हेवीवेट शेअर्स, जाणून घ्या तपशील
शेअर बाजाराची सुरुवात
आज बाजारात सुरुवातीच्या व्यवहार सत्रात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १२० अंकांपेक्षा अधिक घसरून ५७,४३० अंकांवर खुला झाला, तर एनएसई निफ्टी सुमारे ४५ अंकांनी १७,९३० च्या खाली घसरला. दरम्यान, आजही दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या हालचालींवर जागतिक बाजाराच्या कलचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदरांची पतंजली आणि इतर अनेक समभागांवर लक्ष असेल.

बाजारात पडझडीचे सत्र
याआधी बुधवारी बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जागतिक बाजाराच्या दबावामुळे बँकिंग समभागांमध्ये विक्रीचा जोर कायम राहिला. बीएसई सेन्सेक्स जवळपास ३५० अंक घसरून ५७,५५५ अंकांच्या जवळ क्लोज झाला. तर गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात पडझड सुरु आहे. अमेरिकन बाजारातील घसरणीचा सेन्सेक्स आणि निफ्टीवर मोठा परिणाम होत आहे.

देर आए दुरुस्त आए! अदानी शेअरचे छप्परफ़ाड रिटर्न, १ लाख रुपये गुंतवल्यावर मिळाला इतक्या कोटींचा परतावा
अमेरिकन शेअर बाजार
बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अमेरिकन बँकिंग क्षेत्रात गेल्या आठवड्यात सुरू झालेले संकट संपण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत दोन अमेरिकन बँका बंद झाल्या आहेत आणि आता आणखी एक मोठी जागतिक बँकिंग कंपनी, क्रेडिट सुइस देखील संकटात सापडली आहे. यामुळे बुधवारी डाऊन जोन्स ०.८७ टक्के तर एस ऍड पी ०.७० टक्क्यांनी घसरले. याचाच मागोवा घेत आजच्या व्यवहारात आशियाई बाजारातही घसरण झाली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.९४ टक्के, तर हाँगकाँगचा हँगसेंग १.२६ टक्क्यांनी घसरला.

कोणाचे सर्वाधिक नुकसान
सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाले तर केवळ ११ कंपन्यांचे शेअर्स ओपनिंग ट्रेडमध्ये हिरव्या चिन्हात होता, तर १९ कंपन्यांचे शेअर्स घसरले असून बँकिंग क्षेत्रातील सर्व शेअर्समध्ये पडझड होत आहे. सेन्सेक्समधील टाटा स्टीलला सुरुवातीच्या सत्रात सर्वाधिक ३.६५ टक्क्यांचा तोटा सहन करावा लागला. तसेच इंडसइंड बँक २.५० टक्क्यांहून अधिक घसरला तर इन्फोसिस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, विप्रो सारखे शेअर्स सुमारे १-१ टक्के घसरून व्यवहार करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here