परभणी : परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मानवत शहरातील एका घराची पोलिसांनी झडती घेतली असता १९ वर्षीय युवकाने असं काही केलं होतं की वाचून तुम्हीही हादराल. तरुणाने पैसे कमावण्यासाठी आणि मौज करण्यासाठी चक्क २०० रूपयांच्या बनावट नोटा छापून नोटांचा चलनामध्ये वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये सदरील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

परभणीच्या मानवत शहरातील विशाल संतोष खरात हा १९ वर्षीय मुलगा राहत्या घरामध्ये कलर प्रिंटरच्या साहाय्याने २०० रुपयांच्या बनावट नोटा छापत असल्याची माहिती परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली होती. तिच्या आधारे पोलिसांनी विशाल खरात यांच्या घरावर छापा टाकून घराची झडती घेतली असता विशाल खरात कलर प्रिंटरच्या साहाय्याने बनावट नोटा छापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

मुलांना घरात झोपवून आई-बाबा अंगणात झोपले; अचानक आरडाओरड झाली; पत्नी जागीच ठार अन् पती…
पोलिसांनी बनवत नोटा छापण्यासाठी वापरण्यात येत असलेला पेपर आणि कलर प्रिंटर व इतर साहित्य ताब्यात घेतली आहे. सदरील युवकाने बनावट नोटाचा वापर चलनामध्ये करून अनेक जणांची फसवणूक केली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी दिलावर खान रशीद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशाल खरात या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करत आहेत.

फ्लॅटमध्ये पोलिसांची धाड, दरवाजा उघडताच डोळे फिरले; दोघांनी १ BHK च्या घरात जे केलं ते वाचून हादराल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here