जालना : जालना लोकसभा क्षेत्रातील सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील २४ वर्षीय तरुण ऋषिकेश सुभाष वराडे हा आपल्या मित्रांसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला होता. परंतु, या यात्रेच्या प्रवासा दरम्यान अल्पश्या आजाराने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना काय करावे हेच कळेना. मृतदेह कसा परत न्यावा, काय सोपस्कार करायचे हे त्यांना काहीच कळेना.

यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ही दुःखद वार्ता कळाली. त्यांनी पटापट निर्देश देत त्याचा मृतदेह आवश्यक ती कार्यवाही करून दिल्ली येथून कर्नाटक एक्सप्रेसने भुसावळपर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली. स्वतः तिथे हजर राहून ऋषिकेशच्या सोबतच्या मित्रांना साथ दिली आणि कुटुंबियांना फोनवर संपर्क साधून धीर दिला. रेल्वे, कोळसा व खाण तिन मंत्रालयाच्या प्रचंड व्यस्त कारभार आणि सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरू आहे. त्याची व्यस्तता हे सर्व सांभाळत मतदारसंघातील नागरिकांची सुरक्षेसाठी तत्परता राहणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने ऋषिकेशचे पार्थिव त्याच्या गावी पोहचू शकणार आहे.

कलर प्रिंटरमधून छापल्या कोऱ्या करकरती नोटा; १९ वर्षाच्या तरुणाचं डोकं बघा कसं चाललं; घरात शिरताच पोलीस हैराण…

ऋषिकेश हा सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करायाचा. ८ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झालेला असून त्याच्या पश्चात गर्भवती पत्नी, आई, वडील व बहीण असा परिवार आहे. लग्न होऊन ८ महिने झाल्याने त्याच्या मृत्यूविषयी गावावर शोककळा परसली आहे. भविष्याची स्वप्ने पाहात देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेला ऋषिकेश परत येऊ शकला नाही. कळानेच त्याच्यावर घाला घातला.

मुलांना घरात झोपवून आई-बाबा अंगणात झोपले; अचानक आरडाओरड झाली; पत्नी जागीच ठार अन् पती…
परिस्थिती अशी की पर राज्यात मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह त्याच्या गावी आणणंही कठीण झाले होते. पण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या या कार्यतत्परतेमुळे त्याचा मृतदेह लवकरात लवकर त्याच्या गावी पोहचविण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अबब! चंद्रपुरात रात्रीच्या अंधारात काय दिसलं पाहा, अभ्यासकही आश्चर्यचकित…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here