pune paper leak news, पुन्हा पेपर फुटला? १०वी गणिताच्या पेपरचा फोटो सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये, पुण्यात धक्कादायक प्रकार – question paper of 10th maths part i found in security guards mobile phone pune breaking news
पुणे : राज्यात बारावीचे पेपर फुटल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात १० वीच्या गणित भाग एकचा पेपर थेट महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शाळा परिसरात खळबळ उडाली असून १० वीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने सुरक्षा रक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी इथल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज शाळेत दहावीचा गणित भाग एकचा पेपर आहे. सगळे विद्यार्थी परिक्षेसाठी जमले असता तेथील सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये थेट पेपरचा फोटो आढल्याने गोंधळ उडाला आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल… अधिक माहितीनुसार, १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाचा संशय आला. यावेळी तिच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आल्याने अधिकारीही हादरले.