Mumbai Ahmedabad Bullet Train : सध्या मुंबईत अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. यात सर्व मेट्रो कॉरिडोर, कोस्टल रोड आणि एमटीएचएल सारखे प्रोजेक्ट आहेत. आता लवकरच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये देशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी बीकेसी स्टेशनच्या कामासाठी टेंडर देण्यात आलं आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (जॉइंट व्हेंचर) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ३६८१ कोटी रुपयांची सर्वात कमी बोली लावली होती. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार (NHSRCL) हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी आणि मॅसर्स एमईआयएल मिळून स्टेशनची निर्मिती करणार आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीच्या स्टेशनचं काम सुरू झाल्यानंतर ते संपूर्ण बनून तयार होण्यासाठी ५४ महिन्यांचा कालावधी लागेल. मुंबई ते साबरमतीदरम्यान हे एकमेव अंडरग्राउंड स्टेशन असेल. महाराष्ट्रात आतापर्यंत या प्रोजेक्टसाठीच १३.७२ टक्के काम पूर्ण झालं आहे. तर गुजरातमध्ये ३२.९३ टक्के काम पूर्ण झालं आहे.

बीकेसीत कधी सुरू होणार काम?

बीकेसीत कधी सुरू होणार काम?

NHSRCL नुसार, कंस्ट्रक्शनसाठी कंपनी ठरवण्यात आली आहे. लवकरच या कंपनीसोबत अॅग्रीमेंट तयार केलं जाईल. अॅग्रीमेंट झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत सॉइल टेस्टिंग आणि युटिलिटी सर्व्हे अशी कामं सुरू होतील. या जमिनीतून कोणाचंही पुनर्वसन करायचं नाही, त्यामुळे हे काम वेगात सुरू केलं जाईल. मुंबईत स्टेशनशिवाय अंडर ग्राउंड टनलिंगचं कामही केलं जाईल. कंस्ट्रक्शन कंपनी एकूण ४.८५ हेक्टर क्षेत्रात काम करेल.

बुलेट ट्रेनसाठी ६ प्लॅटफॉर्म

बुलेट ट्रेनसाठी ६ प्लॅटफॉर्म

बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील. प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी ४२५ मीटर असेल. भारतीय रेल्वेमध्ये २६ डब्ब्यांच्या गाडीसाठी प्लॅटफॉर्मची लांबी जवळपास ५५० मीटर असते. हाय स्पीड ट्रेनसाठी १६ कोचच्या हिशोबाने प्लॅटफॉर्म बनवण्यात येतील. या स्टेशनला रोड आणि मेट्रोद्वारे कनेक्टिविटी दिली जाईल. या बुलेट ट्रेनसाठी १२ स्टेशन्स असतील. त्यापैकी आठ गुजरातमध्ये, तर चार स्टेशन महाराष्ट्रात बनणार आहेत. साबरमती, अहमदाबाद, नाडियाड, वडोदरा, भरुच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे, बीकेसी अशी १२ स्टेशन असणार आहेत.

जमिनीपासून २४ मीटर खाली धावणार बुलेट ट्रेन

जमिनीपासून २४ मीटर खाली धावणार बुलेट ट्रेन

बीकेसी स्टेशनची एकूण उंची ६० मीटर असेल, पण ग्राउंड लेवलच्या २४ मीटर खाली बुलेट ट्रेन धावेल. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर अरबी समुद्राचं चित्रण करणारी खास थीम असेल. या थीममध्ये ढग आणि उसळणाऱ्या लाटांचे फोटो असतील. यात ग्राउंडसह चार मजले असतील, ज्यात ग्राउंड फ्लोअरला एन्ट्री, सिक्युरिटी, स्क्रिनिंग अशा गोष्टी असलतील. पहिल्या मजल्यावर काही इक्विप्मेंट रुम असतील. दुसऱ्या मजल्यावर बिजनेस क्लास लाउंज, तिकिट ऑफिस, कस्टमर केअर कमर्शिअल शॉप, तर शेवटच्या तिसऱ्या फ्लोअरवर प्लॅटफॉर्म, स्टेशन परिसर आणि सर्विस रुम असतील.

प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा

स्टेशनशी जोडण्यासाठी दोन एन्ट्री आणि एक्झिट असे गेट असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरक्षा व्यवस्था, टिकिटिंग, वेटिंग एरिया, बिजनेस क्लास लाउंज, रेस्ट रुम, स्मोकिंग रुम अशा गोष्टी सामिल असतील. बीकेसी स्टेशन ते मेट्रो लाइन २B ला कनेक्टिविटी दिली जाईल. स्टेशन अशाप्रकारे तयार केलं जाईल, जिथे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. मेट्रो, बस, ऑटो आणि टॅक्सीद्वारे कनेक्टिविटी दिली जाईल.

कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन?

कधीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन?

बुलेट ट्रेनच्या योजनेसाठी NHSRCL ९८.८७ टक्के जमीन संपादित केली आहे. यात गुजरातमध्ये ९८.९१ टक्के, दादरा नगर हवेलीमध्ये १०० टक्के आणि महाराष्ट्रात ९८.७६ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून नुकतंच खारफुटी जंगल तोडण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. यानंतर बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किमीचा भुयारी बोगदा बनवण्याचं काम सुरू होत आहे. यापैकी ७ किमीचा बोगदा समुद्रात तयार होणार आहे. २०२६ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here