नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल तर आतापासूनच तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्ती योजनेची तयारी करावी लागेल. निवृत्तीपर्यंत तुम्ही कोटींचा निधी निर्माण करू शकता. पण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून चांगली संपत्ती निर्माण होण्याइतपत फंड तयार होणे कठीण आहे. यासाठी थोडा जोखीम घेऊन म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य पर्याय ठरू शकतो. इथे पैसा पाण्यासारखा वेगाने फिरतो. म्युच्युअल फंडाचे एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) देखील असेच एक साधन आहे, ज्यामध्ये तुम्ही दीर्घ काळात १० पट पर्यंत कमाई करू शकता.गुंतवणुकीबाबत तुम्ही कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नसाल तर तुम्ही बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करू शकता. परंतु यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही मोठे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही. अशा स्थितीत तुम्ही SIP द्वारे चांगली फंड उभा करू शकता.व्याजातून कमाईसमजा तुम्ही वयाच्या २०व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि पुढील २५ वर्षांसाठी दरमहा ६००० रुपये गुंतवत असाल. आणि सरासरी परतावा १२ टक्के असेल तर वयाच्या ४५व्या वर्षी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार होईल. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार एकूण १ कोटी १३ लाख ८५ हजार ८११ रुपयांचा निधी २५ वर्षांमध्ये सरासरी १२% परताव्याप्रमाणे उपलब्ध होईल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक १८ लाख रुपये असेल. यामध्ये व्याजातून ९५,८५,८११ रुपये मिळतील.किती वर्षांसाठी गुंतवणूक करायची?याप्रमाणे तुम्ही ३० वर्षे गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक २१,६०,००० होईल. म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी तुमच्याकडे २,११,७९,४८३ रुपये असतील. तुम्हाला फक्त फक्त व्याजातून १,९०,१९,४८३ रुपये मिळतील.किमान गुंतवणूकएसआयपीद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून ५०० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. एसआयपीमधून कमी वेळेत जास्त पैसे कमावता येतात. हे नेहमी लक्षात असू द्या की, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइलच्या आधारे निर्णय घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here