गडचिरोली : मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील बहुतांश नदी घाटावर अवैध वाळू तस्करी सुरू आहे. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने आरमोरी तालुक्यातील खोब्रागडी नदीवर अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करीत १६ तस्करांना अटक केली आहे. यावेळी ३.४० कोटींचे साहित्य जप्त देखील करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

वाळू तस्करीविरोधात जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. आरमोरी तालुक्यातील खोब्रागडी नदी घाटावर मागील अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळू उपसा सुरू होते. मोठ मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने उपसा करून रात्रभरात अवजड वाहनातून येथील वाळू बाहेर पाठवण्यात येत होती. याबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्री या ठिकाणी धाड टाकली असता वाळू तस्करी सुरू असल्याचे आढळून आहे. यावेळी तब्बल १६ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. सोबतच तस्करीत वापरले जाणारे ३.४० कोटींचे वाहने देखील जप्त करण्यात आले.

‘माझा जीव त्याच्यामुळेच रडत-रडत गेला’ १९ वर्षीय मुलीने ओढणीने घेतला गळफास, हातात २ चिठ्ठ्या अन्…
अलीकडच्या काळातील वाळू तस्करांविरोधात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजार केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…
जिल्ह्यातील घाटांचे लिलाव झालेले नाही. केवळ नदी काठावरील शेतात साचलेली वाळू वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत तस्कर थेट नदीतील वाळू उपसा करून इतर जिल्ह्यात पाठवीत आहेत. आरमोरी येथील कारवाईत अटक करण्यात आलेले तस्कर बाहेर जिल्ह्यातील आहे.

कलर प्रिंटरमधून छापल्या कोऱ्या करकरती नोटा; १९ वर्षाच्या तरुणाचं डोकं बघा कसं चाललं; घरात शिरताच पोलीस हैराण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here