भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल, त्यामुळे मैदानावरील खेळाडूंना उन्हाचा तडाखा बसू शकतो. दिवसाचे कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २४ अंश राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय आकाश जवळपास निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
वानखेडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा
वानखेडे स्टेडियम भलेही टीम इंडियाचं होम गरुड असेल पण या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ वर्चस्व गाजवताना दिसतो. या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि कांगारू तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये यजमान संघाने केवळ एकच सामना जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली भारताने वानखेडेवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचवेळी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाशी शेवटचा सामना झाला होता.
२०२० मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून पराभव केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तेव्हा यावेळेस हा रेकॉर्ड मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे – १७ मार्च, मुंबई (वानखेडे स्टेडियम)
दुसरी वनडे – १९ मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे – २२ मार्च – चेन्नई