मुंबई : गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहावरील कर्जाबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे खळबळ उडाली होती. पण देशातील प्रसिद्ध टाटा ग्रुप आणि रिलायन्स समूहावर अदानीपेक्षा जास्त कर्ज आहे, हे कदाचित अनेकांना माहीत असेल. कोणत्या उद्योग समूहावर किती कर्ज आहे याची माहिती सविस्तर जाणून घेऊया.देशातील टॉप १० उद्योग समूहाबद्दल बोलायचे झाले तर कर्जाच्या बाबतीत अदानी ग्रुप चौथ्या क्रमांकावर आहे. टाटा, बजाज आणि रिलायन्स समूहावर यापेक्षा जास्त कर्ज आहे. बजाज समूह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रिलायन्स समूहाचे स्थान तिसरे आहे.टाटा समूहावर मार्च २०२२ पर्यंत सुमारे ३.३७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकत्रित कर्ज आहे. टाटा समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या आहेत, ज्या मिठापासून विमानापर्यंतचा व्यवसाय करतात. कर्जाच्या बाबतीत बजाज समूह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपण संपूर्ण बजाज समूहावर नजर टाकल्यास मार्च २०२२ पर्यंत या समूहावर सुमारे ३.२८ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ही कंपनी प्रामुख्याने ऑटोमोबाईल बाजारपेठेतील एक मोठी कंपनी आहे.कर्जाच्या बाबतीत रिलायन्स समूह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार, मार्च २०२२ पर्यंत रिलायन्स समूहावर सुमारे ३.२२ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. दुसरीकडे, अदानी समूह कर्जाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. अदानी समूहावर मार्च २०२२ पर्यंत सुमारे २.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, वादात सापडल्यानंतर कंपनीने आपले बरेचसे कर्ज माफ केले आहे. अदानी समूहाच्या जवळपास एक डझन कंपन्या आहेत.कर्जाच्या बाबतीत आदित्य बिर्ला समूह पाचव्या क्रमांकावर आहे. या समूहावर मार्च २०२२ पर्यंत सुमारे २.१३ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. ही कंपनी देश-विदेशात अनेक व्यवसायात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here