नोएडा: राजधानी दिल्लीजवळच्या नोएडामधील सेक्टर ८ मध्ये असलेल्या एका नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला आहे. महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक टिमला पाचारण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाच्या शरीरावर होळीचे रंग दिसत आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पोलीस आसपासच्या लोकांकडे चौकशी करत आहेत. घटनास्थळी एसीपींसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

घटना होळीच्या आसपास घडली असावी असा अंदाज आहे. तरुणीच्या हातापायाचे तुकडे नाल्याच्या विविध भागांमध्ये सापडले आहेत. घटनास्थळी श्वान पथकांसह फॉरेन्सिकची टीम उपस्थित आहे. नोएडातील सेक्टर ८ हा सर्वात संवेदनशील परिसर मानला जातो.
झाडाला धडकून कार पेटली, संपूर्ण कुटुंब एकाएकी बेपत्ता; १३ दिवस उलटले अन् एक दिवस अचानक…
सेक्टर आठमधील नाल्यात मानवी शरीराचे काही तुकडे सापडले आहेत. हे तुकडे चार ते पाच दिवस जुने असल्याची माहिती नोएडा झोनचे डीसीपी हरिश चंदर यांनी सांगितलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे, असं चंदर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here