बीड : बीडच्या माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्याजवळ सकाळच्या सुमारास पाठीमागून आलेल्या ट्रकने कर्नाटककडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आपल्या गावी जात असताना माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाटा येथे सकाळी साडे सहाच्या दरम्यान त्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातामध्ये २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत.

हायकोर्टाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना झटका, भाजपच्या मंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याचे निर्देश
कवीता संतोष राठोड विरगव्हाण मंठा, वर्षा बाळु राठोड हांडी जिंतुर, शालु शिवाजी चव्हाण विरगव्हाण मंठा, शरद लिंबा चव्हाण करणावळ मंठा, लक्ष्मी शरद चव्हाण करणावळ मंठा, या जखमींवर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बाकी जखमींवर बीड, औरंगाबाद, परभणी येथे उपचार चालू असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए.पी.आय विजयसिंह झोनवाल यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं नेमकं काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here