नागपूर : गर्भधारणा साधारणपणे ९ महिन्यांची असते. काही बाळांचा जन्म वेळेपूर्वी होतो. त्याला मुदतपूर्व प्रसुती म्हटले जाते. गर्भधारणेचा ९ महिन्यांचा कालावधी १५ वर्षांपर्यंत लांबले तर? गरोदरपणाची अशीच एक विचित्र घटना नागपुरातून समोर आली आहे. एक महिला १५ वर्षांपासून गर्भवती होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण गर्भवती असल्याचं तिला माहितही नव्हते. तिच्या पोटात १५ वर्ष मूल होते. इतकी वर्षे आईच्या पोटात राहणाऱ्या या मुलाची अवस्था फारच भयानक झाली होती.

तीन वर्षांपासून सतत उलट्या होत होत्या

नागपुरातील एका महिलेला गेल्या तीन वर्षांपासून सतत उलट्या होत होत्या. तिच्या पोटातही दुखत होते. ती डॉक्टरांकडे जायची. डॉक्टरांनी तिला वेदना निवारक आणि गॅससाठी औषध दिले. पण ही औषधे घेऊनही तिच्यावर काहीच फरक पडला नाही. उलट्या आणि पोटदुखी कायम राहिली. शेवटी ती वृद्धाश्रमात गेली. तेथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर जे पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

बाळ चार महिन्यांचे होते

तिच्या आतड्यात काहीतरी अडकलेलं दिसलं. लेप्रोस्कोपीमध्ये ते एक मूल असल्याचे आढळून आले. हा मुलगा चार महिन्यांचा होता. हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ असल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला १५ वर्षांपूर्वी गरोदर राहिली होती. पण मूल होण्यास तयार नसल्याने तिचा गर्भपात झाला. मात्र गर्भपात न झाल्याने महिलेच्या आतड्यात मूल अडकले. या महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तास ही शस्त्रक्रिया चालली. १५ वर्षांपासून आईच्या पोटात अडकलेले हे मूल अखेर आईच्या शरीरातून बाहेर आले.

VIDEO : चिंचणी बीचवर मद्यपींचा धिंगाणा, कारच्या टपावर बसून स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल

गर्भ झाला बेबी स्टोन

१५ वर्षे पोटात असल्याने मुलाचे दगडात रूपांतर झाले. स्टोन बेबीला वैद्यकीय भाषेत लिथोपेडीयन म्हणतात. गेल्या ४०० वर्षांत स्टोन बेबीची ३०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गर्भपाताच्या ११ हजार प्रकरणांमध्ये असे घडते की मूल शरीरात कुठेतरी अडकले आहे. ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला ती आता बरी आहे.

४६ वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंगनंतर खून; छ. संभाजीनगरात ३० वर्षीय तरुण गजाआड

लिथोपेडीयन का घडतं?

डॉक्टरांनी याला लिथोपेडीयन म्हटलं आहे. तसंच हे त्यावेळी घडतं जेव्हा प्रेगन्सी गर्भाशयाऐवजी पोटात बनते, असंही डॉक्टरांनी सांगितलं. साधारणपणे प्रेगन्सीमध्ये रक्ताची कमतरता राहते तेव्हा भ्रूण विकसित होत नाही. तेव्हा शरीराकडे भ्रूण बाहेर काढण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग राहत नाही. त्यानंतर शरीर इम्यून प्रोसेसचा उपयोग करुन भ्रूण हळूहळू दगड अर्थात स्टोनमध्ये बदलतो. त्यामुळेच महिलेच्या पोटात मिळालेल्या भ्रूणला स्टोन बेबी असं म्हणतात.

​​ गर्भवती महिलेचे नुकसान​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here