नवी दिल्लीः भारत आणि चीनमधील सीमा विवादावरील तणाव कायम आहे. पँगाँग लेकवरील चर्चेपासून चीन दूर पळतोय. या मुद्द्यावर चर्चेची मागणी भारताने केलीय. पण चीनने नकार दिला आहे. १४-१५ जूनला झालेल्या चौथ्या फेरीच्या चर्चेच्या वेळी ही बाब समोर आली. पँगाँग लेकवर बोलणी करण्यास चीन इच्छुक नसल्याचं दिसून आलं. आता दोन्ही देशांमध्ये पँगाँग लेक वादाचे केंद्र बनले आहे.

गलवान खोऱ्यात गोगरा पोस्ट येथील पेट्रोल पॉईंट 17 ए येथील चिनी सैनिकांची तैनाती कमी झाली आहे. पण पँगॉंग सरोवराच्या चिनी सैनिक अजूनही ठाण मांडून आहेत. आणि हेच भारतासाठी चिंतेचं कारण ठरलं आहे. चर्चेदरम्यान चीन पँगाँग सरोवरार बोलण्यास नकार देत असल्याने चीनचे मनसुबे स्पष्टपणे समोर आले आहेत.

गेल्या आठवड्यात दोन घडामोडी झाल्या. सीमेवरील तणावाच्या भागातून चिनी सैनिग मागे हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केलीय. आणि चीन पँगाँग फिंगर कॉम्प्लेक्स येथे मार्गावर आहे, असं भारतातील चिनी राजदूत गेल्या आठवड्यात म्हणाले होते. चीनला यापुढे या विषयावर तणाव वाढवायचा नाही, हा चीनचा थेट संकेत आहे. हा झाला पहिला मुद्दा.

गेल्या तीन आठवड्यांत अक्साई चीन येथे चीनने अनेक ठिकाणं सक्रिय केली आहेत. म्हणजे, कुठल्याही कारवाईसाठी चिनी सैनिक तयारीत आहेत. तसंच पँगाँग सरोवराच्या मुद्द्यावर चीन चर्चेस इच्छुक नसल्याने भारतीय सैन्य ही पूर्णपणे सतर्क आहे. तसंच पँगाँगवर चर्चा केल्याशिवाय दोन्ही देशातील चर्चा पुढे सरकारणार नाही, असंही भारताने स्पष्ट केलं आहे. भारतीय सैन्याचे लेह कॉर्प्सचा कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनचे मेजर जनरल लिन लिऊ यांच्यात रविवारी चर्चेती पाचवी फेरी होणार असल्याची पुष्टी शनिवारी संध्याकाळी उशिरा करण्यात आली. पँगाँग सरोवराशिवाय दोन्ही देशांतील दुसऱ्या चर्चेचा मुद्दा डेपसांगचा आहे. डेपसांगमध्ये चीनने सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसंच त्यांच्या वाहनांची वाहतुकीह वाढली आहे.

भारत-चीन सैन्यात कटुता

गेल्या तीन महिन्यांत भारत-चीनच्या लष्करी संबंधात कटुता निर्माण झाली आहे. शनिवार १ ऑगस्ट हा पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) दिन होता. पण चुशुलमध्ये भारत-चीन सीमा कर्मचार्‍यांची बैठक (बीपीएम) शनिवारी झाली नाही. इस्टर्न कमांडकडून शुभेच्छा दिल्या गेल्या. परंतु कोरोना प्रोटोकॉलमुळे कोणतीही भेटवस्तू दिली गेली नाही, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

चिनी सैनिकांच्या जमावाची बातमी खोटी आहे

लिपुलेख आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात केल्याचं वृत्त खोटं आहे. तिथेही कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी जवानांची तैनाती केली जात आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं इंडिया टुडेने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here