पुणे : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. H3N2 व्हायरसने पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला बळी गेला आहे. भोसरीतील एका ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा या आजारामुळे आज (गुरुवारी) सकाळी मृत्यू झाला. जीवघेण्या H3N2 व्हायरसने देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भोसरीतील एका वृद्धाला या व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या वृध्दाला फुप्फुस आणि ह्रदयाचे आजारदेखील होते. या विषाणूंच्या रुग्णांसाठी शहरातील पाच रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १० आयसोलोशन वॅार्ड राखीव ठेवण्यात आले आहेत, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा, ‘या’ कारणामुळे प्रबळ दावेदार
यापूर्वी, छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय शिक्षणासाठी अहमदनगरमध्ये आलेल्या एका तरुणाचा H3N2 व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे राज्यातील झालेला हा पहिला मृत्यू होता. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आता पिंपरी – चिंचवडमधील H3N2 व्हायरसचा हा महाराष्ट्रातील दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील २३ वर्षीय तरुण अहमदनगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेला होता. काही दिवसांपूर्वी तो कोकणात सहलीला जाऊ आला होता. त्यानंतर तो आजारी पडला. त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याला कोविडची बाधा झाल्याचे आढळून आले. सोबतच त्याची H3N2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

DC IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला मिळाला बुस्टर पॅक; नव्या हंगामासाठी झाले ३ मोठे बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here