रत्नागिरी/चिपळूण : पुणे-बंगळुरु महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला. तरुणीचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तरुणीच्या पतीच्या डोळ्यासमोरच ही दुर्घटना घडली.

या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. तेजस्वी गौरव पेवेकर (वय २४ वर्ष, रा. कळवंडे, ता. चिपळूण सध्या रा. बिबवेवाडी) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. नवविवाहितेचा पती गौरव दिलीप पेवेकर (वय २६ वर्ष) व किशोर सुभाष सुतार (वय ३८ वर्ष, रा. वडगाव हवेली, ता. कराड) हे या अपघातात जखमी झाले आहेत.

गौरव पेवेकर हे पत्नी तेजस्वीसह दि. ११ मार्च रोजी कळवंडे या गावी पालखी सोहळ्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते सोमवारी मोटरसायकलवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला आहे. या नवविवाहितेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

समन्स बजावायला जाताना काळाची झडप, ३२ वर्षीय पोलिसाचा ऑन ड्युटी मृत्यू, गरोदर पत्नीला धक्का
बोरगाव गावाच्या हद्दीत आल्यावर समोरून किशोर सुतार हा मोटारसायकलस्वार आला. त्याला पाहून गौरव पेवेकर यांनी मोटारसायकलचा ब्रेक अचानक दाबला. त्यामुळे त्यांची मोटारसायकल घसरली. पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी खाली कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

लेकीच्या पोलीस भरतीसाठी नाशिकहून पुण्याला, कंटेनरखाली चिरडून पित्याचा हृदयद्रावक शेवट

मोटरसायकलवरील गौरव पेवेकर व दुचाकीस्वार किशोर सुतार हे डिव्हायडरवर आदळून गंभीर जखमी झाले. या अपघाताची खबर मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे विजय देसाई व हवालदार माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय देसाई करत आहेत.

एसटी चालक नवऱ्याला रजा मिळेना, चिडलेली बायको थेट आगारात; डेपोत अंथरुणावर झोपून आंदोलन

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here