मुंबईः शिवसेनेने राममंदिरासाठी १ कोटी रु.ची देणगी देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील एक रुपयाही आला नसल्याचा आरोप रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं केल्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच १ कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा केल्याचा दावा केला आहे.

भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच राम मंदिर उभारणीसाठी १ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर १ रुपयाही ट्रस्टपर्यंत पोहोचला नसल्याचं, राम मंदीर ट्रस्टचं अध्यक्ष महंत गोपालदास यांनी केला आहे. या वर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पलटवार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी राम मंदिरसाठी शिवसेनेच्यावतीने एक कोटी रुपयांचा निधी राम मंदिर न्यासाच्या बँकेच्या खात्यात जमा केले असल्याचं म्हटलं आहे.

वाचाः

निधी जमा केल्यानंतर न्यासाचे खजिनदार अनिल शर्मा आणि संपतराव यांच्याशी फोनवर बोलणंही झालं आहे. त्यानंतर त्यांनी रक्कम जमा झाल्याचं सांगितलं आहे. तरीही न्यासाचे अध्यक्ष गोपालराव देणगी मिळाली नसल्याचं सांगत असतील तर शिवसेनेने एक कोटी रुपये राम मंदिर उभारणीसाठी दिले असताना मग हा निधी कुठे गेला? असा सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

वाचाः

दरम्यान, राममंदिर निर्मितीसाठी स्थापन झालेल्या ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या देणगीबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, ‘राममंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सारे साधुसंत तयारीत आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल.’ यावेळी शिवसेनेने १ कोटी रु. देणगी देण्याची घोषणा केली होती, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘अद्याप शिवसेनेकडून एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते; पण त्यांचीही देणगी अद्याप आलेली नाही. मात्र, मंदिर निर्माणासाठी निधी कमी पडणार नाही.’ असं ते म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here