मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना जर ब्लॅकमेल केले जात असेल, धमकावले जात असेल, लाच देण्याची ऑफर केली जात असेल, तर गृहमंत्री म्हणून हे फडणवीसांचे अपयश आहे, अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शालजोडे लगावले आहेत.

अत्यंत सात्विक, सत्वशील आणि भ्रष्टाचाराचा #भ सुद्धा माहीत नसलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना जर ब्लॅकमेल केले जात असेल, धमकावले जात असेल, लाच देण्याची ऑफर केली जात असेल तर गृहमंत्री म्हणून हे फडणवीसांचे अपयश आहे. पण आम्हाला असे वाटते की ही टिका टिपणी करण्याची वेळ नाही. अशा वेळेला अमृताजींच्या जीविताची काळजी करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर होत असेल तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर अवलंबून न राहता आपण तात्काळ गुजरातच्या गृहमंत्रालयाची मदत घ्यायला हवी, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या डिझायनरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. अनिक्षानं १ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप फडणवीसांनी केला होता. अमृता फडणवीसांनी पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर अनिक्षानं त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली होती.

एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिक्षाच्या घरावर छापे टाकत तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी असून तो फरार आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणं, फसवणूक करणं या संदर्भात गुन्हे दाखल आहेत. अनिक्षानं कायद्याचा अभ्यास असून ती उल्हासनगरात वास्तव्यास आहे.

‘अनिक्षा ही २०१५-१६ मध्ये अमृता यांच्या संपर्कात आली. त्यानंतर ती काही कालावधीसाठी संपर्कात नव्हती. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अनिक्षानं अमृता यांच्याशी पुन्हा संपर्क साधला’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

मोदी सरकारने आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय, निवडणुकीआधीच दिली गोड बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here