म. टा. प्रतिनिधी, : राज्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यात करोनाचा विळखा अधिकच घट्ट बसत चालला आहे. पुणे शहर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल ३०१७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ९० हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर पुण्यात ६३९ रुग्ण गंभीर असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर २२०२ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने धोका अद्याप टळला नाही. १२०३ रुग्ण मात्र बरे होऊन घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, एकट्या पुण्यात ४४ हजार

शहरात रविवारी २५८५ जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत २ लाख ८१ हजार ८४० एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६३९ रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यापैकी ३९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून अतिदक्षता विभागात २४७ रुग्ण आहेत. तर ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या २२०२ एवढी असून ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तर एकूण जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार १०४ रुग्णांची चाचण्या करण्यात आल्या. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत नाही. उलट ती वाढत असल्याने रुग्णालये फुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या १८ हजार ४० झाली आहे. तर १२०३ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत ३८ हजार ११७ रुग्ण बरे झाले आहेत. पुणे शहर जिल्ह्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी सोळा रुग्ण ससून रुग्णालयात दगावले आहेत. पुण्यात ३१ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

वाचाः

करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात ऑक्सिजनसज्ज असलेल्या आणखी ३२५ बेड्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नव्या इमारतीसह बालरोग विभाग तसेच अन्य ठिकाणीही करोनाच्या रुग्णांसाठी एकूण ८७० बेड्स उपलब्ध करण्याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात ससून रुग्णालयातही करोनाग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्सची सुविधा वाढणार आहे.


वाचाः

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९ हजार ५०९ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २९० जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here