बेंगळुरूः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पाही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी ट्विट केले. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करावं, असं येडियुरप्पा यांनी ट्विटध्ये म्हटलंय.

उत्तर प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंहही रविवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यासर्वांना क्वारंटाइन होण्यासह करोना चाचणी करण्याची सूचना केली आहे. त्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहितही यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येडियुरप्पा यांच्या आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

दरम्यान, कर्नाटकमधील करोना रुग्णांची एकूण संख्या १, ३४, ८१९ इतकी झालीय. यापैकी ७४, ५९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ५७, ७२५ जण करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण २,४९६ जण करोनामुक्त झाले आहेत.

देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या रविवारी १७ लाखांवर गेली आहे. रविवारी ५४, ७३६ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ८५३ जणांचा करोनाने मृत्यू झाला. यानुसार देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७, ५०, ७२४ इतकी झाली आहे. यापैकी ५, ६७, ७३० जणांवार सध्या देशात उपचार सुरू आहेत. तर ११, ४५, ६३० जण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ३७, ३६४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here