पिंपरी: पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी शिवभक्तांच्या गाडीला अपघात होऊन ३० ते ३५ जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये एक तेरा वर्षीय मुलगा आर्यन कोंडभर हा गंभीर जखमी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र अखेर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ताथवडे परिसरात हा भीषण अपघात झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवजयंतीच्या दिवशी १० मार्च रोजी मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन हे शिवभक्त परतत होते. त्यावेळी पिंपरी चिंचवड येथील तळवडे जवळ आल्यावर या शिवभक्तांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली होती. त्या धडकेत ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले होते. या काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले होते.

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याची तयारी, पण त्याआधीच सरकारची सकारात्मक पावले, आज घोषणेची शक्यता
किरकोळ जखमी झालेल्यांना उपचार करून सोडण्यात आले. मात्र आर्यन कोंडभर हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीला आणि मेंदूला जबर मार लागल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. तसेच उपचारा दरम्यान त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया देखील झाली होती.

आर्यन कोंडभरला उपचारासाठी ओझस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या ५ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र, आज उपचारादरम्यान, आर्यन कोंडभर याचा मृत्यू झाला. त्याच्या छातीला आणि मेंदूला जबर मार लागला होता. मात्र गुरुवारी दुपारच्या सुमारास त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

काळजी घ्या! मुंबईसह महाराष्ट्रात वाढतोय करोना, केंद्र सरकारने राज्याला दिले महत्त्वाचे आदेश
या अपघातातील सर्व शिवभक्त हे लोणावळा येथील शिलाटने येथील राहणारे होते. आर्यन हा सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मुलगा होता. एवढ्या कमी वयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याला प्रचंड आकर्षण होते. मात्र त्याची उपचारादरम्यान मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली ती सर्वांना चटका लावून जाणारी आहे.

उदय सामंतांची धडाकेबाज कामगिरी, डोंबिवलीमध्ये काळ्या धंद्यांचा पर्दाफाश; फोन करून अधिकाऱ्याला झापलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here