मुंबई : अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्कादायक अहवालात गौतम अदानी यांचे ज्येष्ठ भाऊ विनोद अदानी यांचा अनेकदा उल्लेख करण्यात आला असून समूहातील त्यांच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आणि अदानी समूहात त्यांचे स्टेटसकाय आहे, हे स्पष्ट झाले आहे. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी अदानी ग्रुपचे प्रमोटर आहेत. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले. शेअर मार्केट फाइलिंगनुसार, गौतम अदानी आणि राजेश अदानी समूहाच्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये वैयक्तिक प्रवर्तक असून विनोद अदानी त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

अदानी समूहातील या कंपन्यांवर SEBI ची नजर, स्टॉकच्या वाटचालीवर परिणाम होणार? वाचा
फाइलिंगमध्ये, समूहाने म्हटले की विनोद अदानी हे भारतीय नियमांनुसार अदानी समूहाच्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तक गटाचा भाग आहेत. अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, “आम्ही हे सांगू इच्छितो की गौतम अदानी आणि राजेश अदानी हे अदानी समूहाच्या विविध सूचीबद्ध कंपन्यांचे वैयक्तिक प्रवर्तक आहेत आणि विनोद अदानी वैयक्तिक प्रवर्तकांचे जवळचे नातेवाईक आहेत.” तसेच त्यांनी पुढे म्हटले की, अशा प्रकारे विनोद अदानी हे भारतीय नियमांनुसार अदानी समूहातील विविध सूचीबद्ध कंपन्यांच्या प्रवर्तक गटाचा भाग आहेत.

चर्चा फक्त अदानींच्या कर्जाची का? वाचा टाटा आणि रिलायन्सवरील कर्जाची रक्कम
उल्लेखनीय आहे की २४ जानेवारी रोजी आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात ७४ वर्षीय विनोद अदानींच्या अदानी समूहातील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अदानी शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

अदानी ग्रुपचे यू-टर्न
हिंडेनबर्गचे आरोप अदानी समूहाने फेटाळून लावले आणि विनोद अदानी यांच्याकडे अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्या किंवा त्यांच्या उपकंपन्यांमध्ये कोणतेही व्यवस्थापकीय पद नाही तसेच त्यांच्या दैनंदिन व्यवहारात त्यांची कोणतीही भूमिका नाही, असे म्हटले. बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, विनोद अदानी हे सायप्रसचे नागरिक आहेत.

देर आए दुरुस्त आए! अदानी शेअरचे छप्परफ़ाड रिटर्न, १ लाख रुपये गुंतवल्यावर मिळाला इतक्या कोटींचा परतावा
अदानी शेअर्सची सद्यस्थिती

एक महिन्याहून अधिकच्या काळापेक्षा शेअर्समधील घसरणीनंतर अदानी समूहाच्या शेअर्सनी तेजीची वाट धरली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जवळपास तीन आठवड्यांपासून सुरू असलेली तेजी आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही कायम राहिली. आजच्या व्यवहारात समूहातील सर्व १० समभागांची सुरुवात जोरदार झाली असून अदानी ग्रीनला उघडताच अप्पर सर्किट लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here