मुंबईः मुंबईतील वाढते प्रदूषण आणि ट्रॅफिक यामुळं मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची कामे, मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड यासारखे अन्य प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळं मुंबईत धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं प्रदूषणही वाढत आहे. तर, एकीकडे पालिकेने व सरकारने जुन्या पुलांची पुर्नबांधणी हाती घेतली आहे. पुल बंद केल्यामुळं वाहतूक कोंडीही वाढली आहे. येत्या काही वर्षांत ही समस्या आधीच तीव्र होणार आहे. काण दक्षिण मुंबईत रेल्वे रुळांवरील अनेक पुलांच्या पाडकामास सुरुवात होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना पुन्हा ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल)ने मुंबईतील काही पुलांचे काम हाती घेतले आहे. दादर टिळक ब्रिज, भायखळ आणि रे रोड येथील जुने पुल पाडण्याआधी रेल्वेने नवीन पुल बांधण्याचे काम हाती घेतलं आहे. त्याआधी बेलासिस ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सुचना देणारे पत्र रेल्वेने १४ मार्च रोजी वाहतूक नियंत्रण कक्षाला दिले आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याची तयारी, पण त्याआधीच सरकारची सकारात्मक पावले, आज घोषणेची शक्यता
कोणते पूल बंद होणार

बेलासिस पूल, टिळक पूल, भायखळा एस पूल, आर्थर रोड, करी रोड आणि माटुंगा, या विभातील पुलाचे पाडकाम करण्यास सुरुवात होणार आहे.

मुंबई सेंट्रल आणि ग्रँडरोडमधील बेलासिस पूल धोकादायक स्थितीत आहे. हा पूल जवळपास १३० वर्ष जुना असून ब्रिटशांच्याकाळातील मेजर जनरल जॉन बेलासिस यांच्या नावावरुन या पुलाचे नाव पडले आहे. हा पुल मान्सुननंतर पाडण्यात येण्याची शक्यता आहे. लोअर परेलमधील डिलायल रोड पुलाप्रमाणेच या बेलासिस पुलाच आराखडा तयार करण्यात आला आहे. रुळांवरील पुलाचा भाग रेल्वेकडे तर रस्त्यालगतचा भाग पालिकेकडे अशा प्रकारे या पुलाची पुर्नबांधणी होणार आहे.

सच्च्या शिवभक्ताची झुंज अपयशी; १३ वर्षांच्या आर्यनची प्राणज्योत मालवली, संपूर्ण गावावर शोककळा
बेलासिस पुल- १८९३मध्ये पुलाची निर्मिती
लांबी- ३८० मीटर
किती दिवसांत पूर्ण होणार- ६५० दिवस
खर्च किती येणार- १४० कोटी रुपये

टिळक ब्रिज- १९२५मध्ये निर्मिती
लांबी- ६६३ मीटर
किती दिवसांत पूर्ण होणार- ६४० दिवस
खर्च किती येणार- ३७५ कोटी

भायखळा ब्रिज- १९२२मध्ये निर्मिती
लांबी- ६५० मीटर
किती दिवसांत पूर्ण होणार- ३५० दिवस
खर्च किती येणार- २०० कोटी

रे रोड ब्रिज- १९२०मध्ये निर्मिती
लांबी- २२० मीटर
किती दिवसांत पूर्ण होणार- दोन वर्ष
खर्च किती येणार- १४५ कोटी

एसी लोकलचा स्वयंचलित दरवाजा गेल्या १० दिवसांपासून बंद; महिला प्रवाशानं थेट डब्यातूनच व्हिडीओ केला व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here