म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावतीसोबतच पश्चिम विदर्भात शिवसेनेचा पाया भक्कम करणारे (वय ५१) यांचे रविवारी सायंकाळी झाले. त्यांना फुफ्फुसात वेदना होत असल्याने शहरातील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

पुसतकर हे होते. यादरम्यान त्यांनी विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे अधिकाऱ्यांना धडकी भरायची. संपूर्ण कार्यकाळ आंदोलनाचा राहिला असतानाही कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांचा परिणामही दिसून आला. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून विदर्भात काढलेल्या दिंडीत पुसतकर अग्रेसर होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणातून अलिप्त होते. विदर्भ अनुषेशाचे गाढे अभ्यासक बी. टी. देशमुख यांच्या सिंचन अनुशेषाच्या लढ्यात पुसतकर यांनी स्वत:ला झोकून दिले होते. सामाजिक कार्यातही त्यांची सक्रियता दिसून आली.

मागील दोन वर्षांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते. मधल्या काळात उपचारानंतर सुधारणा झाली होती. करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मुंबईला जाणे धोक्याचे असल्याने त्यांनी नागपुरात उपचार घेण्यास सुरुवात केली. रविवारी सायंकाळी साडेआठ वाजतादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने शहरातीलच डॉ. कडू यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. पण, काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here