Amruta Fadnavis blackmail case | अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडतोय, राऊतांची टीका

 

हायलाइट्स:

  • राज्याला मुख्यमंत्री असता तर अशी वेळ आली नसती
  • मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत आहेत
  • कारभाराची सारी सूत्रे देवेंद्र फडणवीस हलवत आहेत
मुंबई: राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, नागरिकांमध्येही अस्वस्थता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा दररोज मुडदा पडत आहे. ब्लॅकमेलिंगचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे केवळ विरोधकांच्या नावाने खडे फोडत आहेत. ते नाकाने कांदे सोलत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात काय झाले होते, याची गुळगुळीत झालेली टेप ते वाजवत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही बोचरी टीका केली. या राज्यात मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री बसला आहे. राज्याला मुख्यमंत्री असता तर अशी वेळ आली नसती. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत आहेत. कारभाराची सारी सूत्रे देवेंद्र फडणवीस हलवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पॉवरफुल राजकीय कनेक्शन्स, IPS अधिकाऱ्यांशी सलगी; अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षाचे वडील कोण?
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होते. आम्ही त्यांचे प्रशासन पाहिले आहे. पण आता ते देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडतोय, पण ते काही करु शकत नाहीत. त्यांचे सर्व लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. तरीही देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सोलत आहेत. काही झालं की ते लगेच विरोधकांवर आरोप करतात. महाविकास आघाडीच्या काळात काय झालं होतं, हे सांगत बसतात. आता तुमची सत्ता आहे, तुमच्या आठ महिन्यांच्या काळात काय झालं ते सांगा. तिकडे केंद्रात मोदी काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात काय झालं हे सांगत बसतात आणि इकडे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात काय झालं हे सांगतात. मग तुमचा काळ कधी येणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
अमृता फडणवीसांना १ कोटींच्या लाचेची ऑफर, ब्लॅकमेलिंगचा आरोप; अनिक्षा नेमकी कोण? प्रकरण काय?
अमृता फडणवीस यांचे ब्लॅकमेलिंग हा तुमचा कौटुंबिक विषय आहे. आम्हाला भाजपसारखी कुटुंबात घुसण्याची सवय नाही. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. एखाद्या महिलेला अशाप्रकारे ब्लॅकमेल करणं चुकीचे आहे. अशी घटना घडते याचा अर्थ पोलिसांवर राजकीय दबाव आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे बोट दाखवायचे कारण नाही. तुमच्या घरी कोणी व्यक्ती येत असतील त्याच्याशी महाविकास आघाडीचा काय संबंध आहे? या विषयाबद्दल मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here