पिंपरी: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या आई वडिलांना मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याने आईला मुलीचे फोटो देखील पाठवले. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे.

या प्रकरणात अल्पवयीन आईच्या मुलीने हिंजवडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रोशन कैलास चव्हाण ( वय २५) याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे. या घटनेने हिंजवडी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी या दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. आरोपीने स्वताच्या मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर आरोपी मुलीच्या आईकडे पैशांची मागणी करू लागला. पैसे नाही दिले तर तुमच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देखील त्याने मुलीच्या आई वडिलांना दिली.

मुंबईकरांचे ट्रॅफिकचे टेन्शन वाढणार; जुने पूल जमिनदोस्त होणार, कोणत्या भागात बसणार फटका
मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनी संबधित आरोपी मुलाला पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले. पैसे घेतल्यानंतर संबधित आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मुलीचे अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनेनेचे गांभीर्य ओळखत संबधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याची तयारी, पण त्याआधीच सरकारची सकारात्मक पावले, आज घोषणेची शक्यता
ब्लॅकमेल करण्याच्या घटनांमध्ये देखील मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे मोबाईलचा वापर करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here