मुंबई : भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) सीईओ आणि एमडी राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. के क्रितिवासन आता टीसीएसच्या सीईओ पदी रुजू होणार आहेत. क्रितिवासन हे टीसीएससाठी नवीन नाहीत. सीईओ पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते कंपनीचे अध्यक्ष आणि BFSI चे ग्लोबल हेड ऑफ बँकिंग होते. क्रितिवासन यांचा कंपनीच्या महसूल, सौदे आणि व्यवसायात त्याचा सर्वात मोठा वाटा आहे.

टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असून १६ मार्च रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर गोपीनाथन यांच्या राजीनाम्याची बातमी आली.

रतन टाटांचे राइट हँड,दिवसाची कमाई ३० लाख,TCSमध्ये इंटर्न ते आज टाटा ग्रुपच्या सर्वोच्च पदावर
क्रितिवासन ३४ वर्षे टीसीएसमध्ये कार्यरत
क्रितिवासन हे ३४ वर्षांहून अधिक काळ टीसीएस सोबत आहेत. १९८९ मध्ये त्यांनी या कंपनीत नोकरीला सुरुवात केली. कंपनीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यामध्ये वितरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, मोठे कार्यक्रम व्यवस्थापन आणि विक्री यांचा समावेश होतो. त्यांनी आपली आतापर्यंतची संपूर्ण कारकीर्द टीसीएसमध्ये घालवली आहे. यामध्ये त्यांच्या आणि गोपीनाथन यांच्यात साम्य आहे. क्रितिवासनने टीसीएसच्या महसुलात सुमारे ३५-४० टक्के योगदान दिले आहे, जो BFSI विभागातून येतो.

गुंतवणूकदारांना मोठा नफा! टाटांचा ऑटो शेअर घेणार मोठी उसळी, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या
अध्यक्ष या नात्याने क्रितिवासन हे विकास धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणी, आर्थिक कामगिरीत सुधारणा, ग्राहकांच्या विचारसरणीत सुधारणा आणि बाजारपेठेतील स्थिती यासाठी जबाबदार होते. त्यांनी अनेक मोठ्या क्लायंटना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मॅनेजमेंट सायकल एक्सीलरेशन बदलणे, कॉस्ट ऑप्टिमायझेशन नंतर मूल्य वाढवणे आणि आयटी प्रोग्राम गव्हर्नन्स स्थापित करण्यात मदत केली आहे.

टाटांची कंपनी बंद होता होता राहिली; वाचवण्यासाठी या महिलेने विकला कोहिनूरपेक्षा मौल्यवान हिरा
कोईम्बतूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण
नवीन सीईओ यांचा टीसीएस Iberoamerica, टीसीएस आयर्लंड आणि टीसीएस टेक्नॉलॉजी सोल्युशन्स एजीच्या पर्यवेक्षी मंडळात सामावेश आहे. त्यांनी कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे. कृतिवासन यांनी १९८७ मध्ये IIT कानपूरमधून औद्योगिक आणि व्यवस्थापन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

शेअर्सवर परिणाम होईल
१६ मार्च रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर गोपीनाथन यांच्या राजीनाम्याची बातमी आली असल्याने या बातमीचा परिणाम १७ मार्च रोजी शेअर बाजारावर दिसून येईल. १६ मार्च रोजी टीसीएसचे समभाग ०.५३ टक्के घसरून ३,१८२ रुपयांवर बंद झाले होते. तर आज टीसीएसचे शेअर्स १३५० रुपयांच्या पातळीवर गॅप डाऊन ओपन झाले. त्यानंतर शेअर्स वधारून १३९४ रुपयांपर्यंत व्यवहार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here