नोएडा: राजधानी दिल्लीजवळच्या नोएडामधील एका सोसायटीत चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. सेक्टर ७५ मधील एका सोसायटीत कार सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्यात आलं. त्यामुळे तो संतापला. भडकलेल्या कर्मचाऱ्यानं सोसायटीमधील १५ कारवर ऍसिड फेकलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ऍसिडमुळे १५ कारचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सेक्टर ७५ मधील सोसायटीत रामराज २०१६ पासून कार धुण्याचं काम करायचा. त्याला कामावरून काढण्यात आलं. त्यामुळे संतापलेल्या रामराजनं पार्किंगमध्ये असलेल्या १५ कारवर ऍसिड फेकलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सर्व कार मालकांनी घटनेची तक्रार सेक्टर ११३ पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामराज गेल्या ७ वर्षांपासून कार धुण्याचं काम करत होता, अशी माहिती सेक्टर ७५ मध्ये असलेल्या मॅक्सब्लिस व्हाईटहाऊस सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या संजय पंडित यांनी दिली.
झेड प्लस सुरक्षेसह बुलेटप्रूफ कारनं फिरला, ५ स्टारमध्ये राहिला; सत्य समजताच धक्काच बसला
आठवड्याभरापू्वी काही जणांनी रामराजला कामावरून काढलं. त्यानंतर तो अन्य कार धुण्याचं काम करायचा. बुधवारी सकाळी सुरक्षा रक्षकानं रामराजला बेसमेंट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १५ कारवर ऍसिड फेकताना पाहिलं. ऍसिड फेकल्यानंतर रामराजनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला गेटवर पकडलं. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. १५ कारच्या मालकांनी तक्रार दाखल केली. यानंतर रामराजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
झाडाला धडकून कार पेटली, संपूर्ण कुटुंब एकाएकी बेपत्ता; १३ दिवस उलटले अन् एक दिवस अचानक…
रामराज हरदोईचा रहिवासी असून तो होशियारपूरमधील एका गावात भाड्याच्या घरात राहतो, अशी माहिती सेक्टर ११३ पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी दिली. कोणीतरी मला ऍसिड दिलं होतं, असं रामराजनं चौकशीत पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here