लखनऊ: उत्तर प्रदेशच्या एटामध्ये फसवणूक करून दुसरं लग्न करण्यास निघालेल्या दोन मुलांच्या बापाचा पर्दाफाश झाला आहे. पती दुसरं लग्न करत असल्याची कुणकुण पत्नीला लागली. त्यानंतर तिनं आणि तिच्या भावानं लग्नस्थळ गाठलं. मंडपात जाऊन गोंधळ घातला. दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायला निघालेल्या नवरदेवाला मारहाण केली. यानंतर वधूकडच्या मंडळींनी नवरदेवाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. वधूच्या वडिलांनी नवरदेवाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वराची रवानगी तुरुंगात केली. लग्न मंडपातून पळून गेलेल्या नातेवाईकांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेल्या कपिंजल यादवचं पहिलं लग्न १८ एप्रिल २०१२ रोजी कासगंजला राहणाऱ्या श्वेता यादवशी झालं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात मुक्तहस्ते खर्च केला. जावयाला २० लाख रुपये दिले. कपिंजलला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दोन मुली झाल्यानंतर कपिंजल आणि त्याच्या कुटुंबीयांची वर्तणूक अचानक बदलली. त्यामुळे श्वेता मुलींना घेऊन माहेरी गेली.
झाडाला धडकून कार पेटली, संपूर्ण कुटुंब एकाएकी बेपत्ता; १३ दिवस उलटले अन् एक दिवस अचानक…
पत्नी श्वेता कासंगजला गेल्यानंतर कपिंजलच्या कुटुंबीयांनी त्याच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यासाठी एटामध्ये सोयरिक जुळवली. १५ मार्चला कपिंजल धुमधडाक्यात वरात घेऊन दाखिनी रिसॉर्टला पोहोचला. संध्याकाळपर्यंत विवाहाचे सर्व विधी संपन्न पूर्ण होण्यास आले. मात्र जयमाला सुरू होताच पहिली पत्नी श्वेता आणि तिचे भाऊ स्टेजवर पोहोचले. त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी कपिंजलला मारहाण केली. श्वेता आणि तिचे कुटुंबीय वेळीच दाखल झाल्यानं कपिंजलचं पितळ उघडं पडलं.
झेड प्लस सुरक्षेसह बुलेटप्रूफ कारनं फिरला, ५ स्टारमध्ये राहिला; सत्य समजताच धक्काच बसला
कपिंजल विवाहित असल्याचं कळताच वधू आणि तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्यानं, फसवणूक करण्यात आल्यानं वधूनं लग्नास नकार दिला. वधूच्या वडिलांनी पोलिसांना बोलावलं. कपिंजल आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. श्वेताचा भाऊ मनोज कुमारच्या तक्रारीवरून पोलिसांनी कपिंजल आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नवरदेवाला अटक होताच मंडपातून धूम ठोकणाऱ्या नवरदेवाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

स्वप्नात श्रीकृष्णानं माझ्या गळ्यात हार घातला; उत्तर प्रदेशातील तरूणीचं कृष्णाच्या मूर्तींशी लग्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here