इडुक्की : केरळमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या २८ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूने मानसिक धक्का बसलेल्या महिलेने ७ वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली. घराच्या आवारात असलेल्या ४० फूट खोल विहिरीत मुलासह उडी घेऊन महिलेने जीव दिला. गुरुवारी सकाळी उप्पुथरा या गावात ही घटना घडली. या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. लिझा (वय ३८) असे महिलेचे आणि बेन टॉम असे तिच्या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे लिझा ही थोडूपुझामध्ये अलाकोड सहकारी बँकेत मॅनेजर होती.

आजारामुळे लिझा यांच्या एका मुलाचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला होता. या मुलाच्या मृत्यूपासूनच लिझा यांची मानसिक स्थिती बिघडली होती. यानंतर तिला तिसरं मुल झालं होतं. आणि २८ दिवसांनी या बाळाचा मंगळवारी मृत्यू झाला. बाळाला स्तनपान करत असताना दूध घशात अडकून बाळ गुदमरलं आणि या घटनेत बाळ दगावलं, अशी माहिती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली.

आपल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याने लिझा दुःखात होती. तीला मोठा मानसिक धक्का बसला होता. बाळावर अंत्यसस्कार झाल्यानंतर लिझा आत्महत्या करू शकते, असं बुधवारी आमच्या लक्षात आलं होतं. यामुळे संपूर्ण कुटुंबाचं तिच्यावर बारकाईने लक्ष होतं. पण गुरुवारी सकाळी कुटुंबातील सर्वजण चर्चमधील प्रार्थनेला जाण्यासाठी तयारीत असताना तिने आपल्याला मुलाला घेतलं आणि विहिरीत उडी घेतली, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

महिलेने मुलासह विहिरीत उडी मारतात कुटुंबांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाहन केलं. तसंच अग्निशमन दलाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचाव मोहीम राबवली. पण विहिर खूप खोल असल्याने बचाव करणं अवघड गेलं आणि महिला आणि त्याच्या मुलाला वाचवता आलं नाही, असं स्थानिकांनी सांगितलं.
मूकबधीर महिलेवर दिराकडून वारंवार अत्याचार, खाणा-खुणांनी सांगितली आपबिती, पोलीसही सुन्न…
जवळच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इडुक्कीला पाठण्यात आले. आज दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एकूणच या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

मुलीला बारावीत कमी मार्क्स, वराने लग्न मोडलं, पण वधूच्या वडिलांचा वेगळाच आरोप, म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here