मुंबई: लेकीनं आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. लालबागमधील इब्राहिम कासीम चाळीत राहणाऱ्या वीणा जैन यांचा मृत्यू तीन महिन्यांपूर्वी झाला. वीणा यांची हत्या त्यांची मुलगी रिम्पलनं केल्याचा संशय पोलिसांना आहे. तर आईचा मृत्यू नैसर्गिक होता. मात्र त्यासाठी मलाच जबाबदार धरण्यात येईल या भीतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याचा दावा रिम्पलनं केला. रिम्पल सध्या काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात आहे.

रिम्पलची आई वीणा अनेक दिवसांपासून शेजाऱ्यांना, नातेवाईकांना दिसल्या नाहीत. याबद्दल विचारणा केली असता, रिम्पलनं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे नातेवाईकांना संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीतील रहिवाशांना दुर्गंधी येत होती. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर रिम्पलनं घराबाहेर पडणं कमी केलं. ती केवळ शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडायची. दुर्गंधी कमी करण्यासाठी तिनं परफ्युमच्या २०० बाटल्या आणि रुम फ्रेशनरचा वापर केला.
तू ड्रेन सक्शन कप आण! आईला संपवणाऱ्या लेकीची प्रियकराला सूचना; ३ महिन्यांपूर्वी काय घडलं?
रिम्पलवर आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. या सगळ्यात रिम्पलला कोणीतरी साथ दिली असावी, कोणाच्याही मदतीशिवाय हे सगळं अवघड असल्याचं पोलिसांना वाटतं. १४ मार्च २०२३ रोजी वीणा यांचा मामेभाऊ त्यांच्या भेटीसाठी आला होता. त्यावेळी रिम्पलनं त्यांना खोटी माहिती दिली. आईला पॅरालिसिसचा झटका येऊन गेला. ती ‘सँडविचवाल्या बॉबी’सोबत कानपूरला गेली आहे, असं रिम्पलनं तिच्या मामाला सांगितलं. यानंतर पोलिसांचं एक पथक १३०० किमी दूर असलेल्या कानपूरला रवाना झालं आहे. रिम्पल राहत असलेल्या चाळीच्या परिसरात बॉबी सँडविचचा स्टॉल लावायचा.

रिम्पलच्या इमारतीच्या परिसरात असलेल्या एक चायनीज हॉटेल आहे. तिथे काम करणारा एक तरुण रिम्पलच्या सातत्यानं संपर्कात असायचा. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक पश्चिम बंगालला गेलं आहे. रिम्पलच्या घरात पोलिसांना कटर, चाकू सापडला. त्यावर असलेले रिम्पलचेच आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. रिम्पलला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Lalbaug Murder: रिंपलचा धक्कादायक खुलासा, आईच्या मृतदेहाचे तुकडे का केले? बाथरुममधून तुकडे गटारात फेकले
रिम्पल दररोजचं जेवण सोसायटीच्या खाली असलेल्या श्री साई फास्ट फूड स्टॉलवरून मागवायची. हा स्टॉल उमेश खवरे चालवतात. ‘मी दररोज सकाळी साडे वाजता स्टॉल सुरू करतो. त्यावेळी रिम्पल मला कॉल करायची आणि २ वडापाव मागवायची. मी तिला जेवणही द्यायचो. पण ती कधीही खाद्यपदार्थ नेण्यासाठी खाली आली नाही. मी तिच्या दाराबाहेर जेवण ठेवायचो. ती दर १० दिवसांनी मला पेमेंट करायची,’ असं खवरे म्हणाले.

माझं वडिलांकडून लैंगिक शोषण, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here