बीड : आष्टीत पावडर आणि रसायनांपासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश करण्यात आलाय. आष्टी शहरातील संभाजीनगर भागातील एका गोडाऊनवर छापा टाकत, डेअरीवर भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी लागणारे पावडर आणि रसायनाचा मोठा साठा आष्टी पोलीस आणि अन्न प्रशासनाने जप्त केलाय. विशेष म्हणजे हा गोरखधंदा राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे हे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अन्न प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १३२ पांढऱ्या गोण्या पावडर आणि पत्र्याचे २२० डब्बे रसायन असा ८ लाख ९१ हजार ३७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍण्ड मिल्कसचे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अन्य एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सतीश शिंदे हे फरार झाले आहेत. नंदू मेमाणे नावाच्या एका आरोपीला पोलिसांकडून अटक केरण्यात आली आहे.

कोण आहे सतीश शिंदे?

सतीश शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. चार वर्षापासून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी ह्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. पैलवान सतीश आबा शिंदे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत. दरम्यान, सतीश शिंदे हे पावडर आणि रसायनापासून दूध बनवून ते पुणे येथे विकत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त इम्रान हाश्मी यांनी फोनवरून दिली आहे. राजकीय क्षेत्रात वजन असल्याने राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्यावर यापूर्वीही अनेक प्रकरणात अडचणीत आलेत. पण त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. एका पक्षाचे पद असल्याने एक वेगळ्या पद्धतीने आपला व्यवसाय आणि आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीचा अविर्भावात हा व्यवसाय सतीश शिंदे हे सर्रासपणे आष्टी तालुक्यात करत आहेत. मात्र, असा दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांना पक्षात कसं काय ठेवलं जातं? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दारूच्या नशेत महिला, बस स्थानकातून रात्री उद्यानात नेलं अन् सकाळी अर्धनग्न अवस्थेत आढळली
अन्न व औषध प्रशासनाची यापूर्वी केजमध्ये कारवाई

बीड जिल्ह्यात यापूर्वीही अशा गैरप्रकारांवर आळा घालत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. केज तालुक्यातील एका खवा बनवणाऱ्या केंद्रावर धाड टाकून तब्बल लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा आणि त्याचबरोबर भेसळयुक्त पावडरच्या जवळपास ५०० हून अधिक बॅगा आणि त्याचबरोबर हजारो किलोचा भेसळयुक्त खवा जप्त केला होता. हा भेसळयुक्त खवा बीड जिल्ह्यासह अनेक राज्यात पाठवला जाऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात होता. त्यानंतर आता आष्टी तालुक्यात दूध भेसळीवर अन्न औषध विभागाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

अपघाती रुग्णांनाही उपचार मिळेना; सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here