प्रियंका मंगळवारी सकाळी मामा रावेंद्र प्रताप यांच्यासोबत पोलीस ठाण्यात पोहोचल्या. पती बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे मुदितला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. डॉक्टरची हत्या करून मृतदेह महाराजपूरला महामार्गाच्या शेजारी असलेल्या झाडीत फेकल्याची कबुली मुदितनं दिली. त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे परिसरात शोध घेतल्यानंतर डॉक्टरांचा मृतदेह हाती लागला. रात्री उशिरा पोलिसांना मृतदेह सापडला. प्रियंका डॉक्टरांची दुसरी पत्नी आहे.त्यांची पहिली पत्नी डॉ. रुचीदेखील उन्नावमध्येच राहते.
मुदितनं डॉक्टरांना आधी त्याच्या सरकारी निवासस्थानी बोलावलं. तिथे त्यांना दारू पाजली. यानंतर त्यानं डॉक्टरांची हत्या केली, अशी माहिती चकेरीचे सहायक पोलीस आयुक्त अमरनाथ यांनी दिली. डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्यानं डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुदितनं डॉक्टरांचा मृतदेह महामार्गाशेजारी असलेल्या झाडीत फेकला. प्रियंका आणि मुदितचे प्रेमसंबंध होते. याची माहिती गौरवला समजल्याचा संशय मुदितला होता. गौरव आपली हत्या करेल, अशी भीती मुदितला होती. त्यामुळे त्यानं गौरवची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं.